5 followers 0 articles/week
सैराट झालं जी

लेख चित्रपटाबद्दल नाही कारण काही लिहायचं शिल्लकच नाही. सुरुवातीपासून ते क्लायम्याक्सपर्यंत सगळं काही लोकांनी लिहून टाकलंय. आणि आम्ही एकेक वाक्य तपासत बसतो की कुठे एखादा महत्त्वाचा प्रसंग उघड होत नाही ना. हे म्हणजे आपण लाल दिवा हिरवा होण्याची वाट बघत असावं आणि पलिकडे दाऊद आणि छोटा राजन ग्यांगचा गोळीबार चालू असावा तसं झालं. लेख आहे 'सैराट'च्या संगीताबद्दल....

Wed May 11, 2016 11:51
अली

सहा महिन्यांपूर्वी जर मला कुणी सांगितलं असतं की तू बॉक्सिंगवर लेख लिहिणार आहेस तर मी त्याला वेड्यात काढलं असतं. मी कथकली किंवा भरतनाट्यमवर लिहीणं जितकं अशक्य आहे तितकंच हे ही होतं. तरीही आज हा लेख लिहितो आहे याचं सर्व श्रेय हॉलीवूडला. 'रॉकी' बरेचदा बघितला होता, नंतर 'रेजिंग बुल' बघितला. इस्टवुडचा 'मिलियन डॉलर बेबी' आणखीन एक उल्लेखनीय चित्रपट, मात्र...

Tue Mar 22, 2016 11:11
डिसक्लेमर

हल्ली ब्लॉगचं वट्ट प्रॉडक्शन थांबलेलं आहे. याबद्दल लोकांनी विचारणाही केली, त्याबद्दल अनेक आभार. खरं तर कधी कधी मला हा ब्लॉग लोक अजूनही वाचतात याचंच आश्चर्य वाटतं. काही जुने लेख आता इतके बालीश वाटतात की डिलीट करण्यासाठी हात सारखा शिवशिवत असतो. माझं बहुतेक आयुष्य कॉस्मोपॉलिटन वातावरणात गेलं त्यामुळे शुद्ध मराठीच्या नावाने बोंब. बहुतेक र्‍हस्व दीर्घ अजूनही...

Mon Feb 29, 2016 09:36
अंदाज अपना अपना

"गोगो मायबाप, ये भरी हुई पिस्तोल मुझे दे दो. " संदर्भ लागला का? लागला तर हा लेख आवडू शकेल. लागला नाही तर कळायला जरा कठीण जाईल. काही काही यशस्वी विनोदी कलाकृतींचं एक वैशिष्ट्य असतं. त्यातल्या वाक्यांचे तुकडे कुठेही वापरता येतात. आणि अश्या कलाकृतींचे फ्यान भेटले की मग इतके तुकडे फेकले जातात की त्या कलाकृतींचं अभिवाचनच सुरू होतं. हा अनुभव मी अनेक अमरुंबरोबर१...

Fri Nov 20, 2015 10:32
टोपीकरावर स्वारी

मराठी ब्लॉग बघितल्यावर अमराठी लोकांची पंचाइत होते. गूगल ट्रान्सलेटचा अनुवाद इतका भयानक असतो की विचारता सोय नाही. म्हणून आता इंग्रजी भाषेत एक ब्लॉग सुरु केला आहे. यात विषय बहुतेक तेच असतील. किंबहुना मराठीतील काही लेखांचा इंग्रजी अनुवाद करण्याचाही विचार चालू आहे. पण हे करत असताना एक गंमत झाली. मराठी लेखाचा जसाच्या तसा अनुवाद बरोबर वाटत नव्हता, म्हणून...

Wed Oct 7, 2015 07:00
सनसनी खेज खबर : मिष्टर ब्लॉगर का पर्दाफाश!!

आमच्या ब्लॉगला बक्षीस मिळाल्याच्या बातमीकडे पाहून ओबामांनी नाक मुरडल्याची बातमी 'न्यूयॉर्क टाइम्स' ने न छापल्याने आम्हाला कळली. तसेच बुर्कीना फासो येथील मेंढी-बकरी उत्पादन, नियोजन आणि संवर्धन मंडळाने ब्लॉगचा निषेध केल्याची बातमी आमच्या नजरेतून सुटली नाही. या विरोधी आवाजांचे प्रतिनिधित्व म्हणून आम्ही सैतानाचा वकील होऊन आमचीच मुलाखत घ्यायची ठरवली. इथे...

Sun Sep 27, 2015 08:25

Build your own newsfeed

Ready to give it a go?
Start a 14-day trial, no credit card required.

Create account